18/1/2014
मुंबई : येत्या रविवारी मुंबईमध्ये मॅरेथॉन होणार आहे. त्यामुळे शहरातील दक्षिण भागात धावणार्या बेस्ट बसेसच्या मार्गात वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काही बदल करण्यात येणार आहेत.
रविवार, १९ जानेवारी रोजी मुंबईत मॅरेथॉन होणार आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत बस मार्ग क्रमांक १0५, १0६, १0८, १२३, १२५, १३२, १३३ आणि १५५ या बस मार्गाचे प्रवर्तन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंत्रालय, मेयो रोड (हुतात्मा चौक), बाबुलनाथ, वाळकेश्वर, कमला नेहरू पार्क, वरळी डेअरी आणि ग्रॅण्ट रोड स्थानक या बस चौक्या देखील दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, दुपारी १२ नंतर हे सर्व बस मार्ग तसेच बस चौक्या पूर्ववत कार्यरत होणार आहेत. तसेच काही बस मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. महात्मा फुले मार्केट-सीएसटीकडून कुलाबा, नेव्ही नगरकडे प्रवर्तित होणारे बसमार्ग कर्नाक ब्रिज, कर्नाक बंदर, पी. डिमेलो रोड आणि शहीद भगतसिंग मार्गाने चालवण्यात येणार आहेत. कृष्णचंद मार्गाने (लीलावती हॉस्पिटल) वांद्रे रिक्लेमेशनकडे जाणारे सर्व मार्ग हिल रोडमार्गे चालवण्यात येणार असून वीर सावरकर मार्गावरून प्रवर्तित होणारे बस मार्ग परळ एसटी आगार, पांडुरंग बुधकर मार्ग, कॉ. पी.के. कुरणे चौक, जी. एम. भोसले मार्ग, ई. मोझेस मार्ग, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजीअली, वसंतराव नाईक चौक, नाना चौक, पंडित पलुस्कर चौक मार्गे चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या बस मार्गातील तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

No comments:
Post a Comment