हार्बरवर एसी एलिव्हेटेड ट्रेन २0३१ मध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2014

हार्बरवर एसी एलिव्हेटेड ट्रेन २0३१ मध्ये

13/1/2014
मुंबई : हार्बर मार्गावर दिवसेंदिवस वाढणार्‍या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी सीएसटी ते पनवेल स्थानकांदरम्यान फास्ट कॉरिडोर तयार करण्याची भन्नाट योजना मुंबई रेल विकास महामंडळातर्फे आखण्यात आली आहे. त्या दृष्टीने अभ्यासही सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे.

एमआरव्हीसीने केलेल्या अंदाजानुसार सीएसटी-पनवेल मार्गावर असणारी गर्दी २0२१पर्यंत दुप्पट होणार आहे. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्यामुळे या भागातील वस्ती मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आजच्या वाहतुकीला पर्यायी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. सीएसटी-पनवेल हा ४९ किमीचा कॉरिडोर सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून तयार करण्याचा प्रस्ताव एमआरव्हीसीने आखला आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गासाठी कंट्रोल रूम आणि प्लॅटफॉर्मसह संपूर्णपणे स्वतंत्र पायाभूत सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वेची काही रेल्वे स्थानके वापरली जाणार आहेत; परंतु प्लॅटफॉर्म मात्र वेगळेच ठेवण्यात येणार आहेत.

या मार्गावर एसी आणि नव्या ब्रॅण्डच्या अद्ययावत ट्रेन वापरण्याचाही एमआरव्हीसीचा प्रस्ताव आहे. या नवीन रेल्वे कॉरिडॉरसाठी रेल्वे मंत्रालय त्यांची जमीन एमआरव्हीसीला भाडेतत्त्वावर देईल आणि राज्य सरकारच्या मदतीने आवश्यक तेवढी जमीन मिळवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी आता सुखद, आरामदायक प्रवासाची स्वप्ने पाहू शकतात. हा कॉरिडोर सध्याच्या रेल्वे रुळांवर पण काही मीटर उंचीवरून जाणार असल्याने जागेचीही अडचण भासणार नाही. या प्रकल्पासाठी सर्व्हे करण्याची जबाबदारी रेल इंडियन टेक्निकल अँण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसेसकडे सोपवण्यात आली असून या कामाला सुमारे एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

या सर्व्हेमध्ये प्रकल्पासाठी लागणार्‍या स्टेशन्सची जागा, इतर पायाभूत सुविधा आदींविषयी अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर एसी डब्यांपासून इतर विविध खर्चांचा आढावा घेतला जाणार आहे. ही फास्ट ट्रेन सीएसटी, वडाळा, चेंबूर, कुर्ला, मानखुर्द, वाशी, बेलापूर, सीवूड दारावे आणि पनवेल या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. एमयूटीपी ३ अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईमधील जे प्रवासी फस्र्ट क्लासने मुंबईमध्ये कामासाठी येतात त्यांना या फास्ट ट्रेनमुळे दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात हा प्रकल्प अस्तित्वात येण्यासाठी २0३१ची वाट पाहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS