13/1/2014
मुंबई : उपनगरी रेल्वेतून प्रवास करणार्या महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) येत्या काळात नव्या ७२ लोकल उपनगरी सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. या लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेमध्ये महिला प्रवाशांवर हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेविषयी पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने लोकलमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या परे मार्गावरील लोकलमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील सीसीटीव्हीचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने काही गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च सुमारे २५ ते ३५ कोटी रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. प्रत्येक नव्या गाडीची किंमत सुमारे ४२ कोटी रुपये असून दोन नमुना गाड्या तयार आहेत, मात्र त्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी देताच येत्या मे महिन्यापासून आणखी तीन ते चार गाड्यांचे उत्पादन केले जाणार आहे. या योजनेस परवानगी मिळाल्यास महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवूनच त्या सेवेत आणण्यात येणार आहेत. यापूर्वी परेने दोन वर्षांपूर्वी सीसीटीव्हीचा प्रयोग राबविला होता, मात्र त्यातील प्रतिमा अस्पष्ट असल्याने हा प्रयत्न फसला होता. तर नव्या चाचण्यांमध्ये प्रतिमांचा दर्जा चांगला असल्याचे आढळून आले आहे. उपलब्ध असणार्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यापेक्षा उत्पादन प्रक्रियेत असलेल्या गाड्यांमध्ये नवीन यंत्रणा लावणेच योग्य असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक डब्यांसाठी ही किंमत साधारण दीड लाख रुपये इतकी आहे.

No comments:
Post a Comment