10/1/2014
| पालिकेची विकास आराखडा कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत अनेक पालकांनी मुंबई महापालिकेच्या शाळांचे वर्ग दहावीपर्यंत वाढवण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच शाळेत मिळणार असेल तर विद्यार्थ्यांची गळती कमी होईल, असे मत प्रथम या संस्थेने या कार्यशाळेत मांडले. त्याला पालकांनीही पाठिंबा दिला. दरम्यान, सध्या आठवीपर्यंत वर्ग असणार्या शाळांची संख्या आधी ४९ होती. त्यानंतर ही संख्या १४९ पर्यंत वाढवण्यात आली. आता आणखी २0 शाळा वाढल्याने ही संख्या १६९ इतकी झाली आहे. टप्प्याटप्प्याने हा टप्पा आणखी वाढवण्यात येईल, असे पालिकेचे शिक्षण उपायुक्त सुनील धामणे यांनी स्पष्ट केले. मुंबईत अनेक ठिकाणी सरकारी अनुदानित शाळा उपलब्ध असतात. त्यामुळे गरज असेल त्याठिकाणीच पालिका शाळांचे वर्ग वाढवण्यात येत असल्याचे धामणे यांनी सांगितले. परळ एफ दक्षिण कार्यालयात पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विकास आराखड्यांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वयंसेवी संस्थांसह पालकांनीही सहभाग घेतला होता. |


No comments:
Post a Comment