10/1/2014
मुंबई : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी अन्न अधिकार अभियानाने केली आहे. आझाद मैदानात अभियानाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी या वेळी उपस्थिती लावली. राजकारण बाजूला ठेवून या मुद्दय़ावर लक्ष घालणार आहोत. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांपुढे हा मुद्दा मांडणार असल्याचे आश्वासन तावडे यांनी या वेळी दिले.
सामाजिक स्तरावर कार्यरत असलेल्या २५ संघटना अन्न अधिकार अभियानात एकवटल्या आहेत. रेशनिंग कृती समिती, श्रमिक मुक्ती संघ या आणि इतर संघटनांचा यामध्ये समावेश आहे. अन्न सुरक्षा कायद्याचा सामान्य जनतेला लाभ मिळवण्यासाठी अभियानाने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या लाभार्थींच्या कोट्यातून वगळण्यात येणार्यांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे बर्याच वर्गावर अन्याय होणार आहे. गरजवंत कुटुंबीयांना त्वरित रेशन कार्ड देऊन त्यांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश करावा, अन्न सुरक्षेत पुरवण्यात येणार्या अन्न धान्यांमध्ये डाळ, तेल आणि इतर घटकांचा समावेश करणे अशा मागण्या अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठेवल्या आहेत.


No comments:
Post a Comment