2/1/2014 http://jpnnews.webs.com
कल्याण : कल्याण रेल्वे पोलिसांच्या प्रामाणिकपणाची प्रचिती घाटकोपर येथे राहणार्या व्यापार्याला आली. रेल्वेत प्रवासादरम्यान विसरलेले जवळपास साडेचार लाखांचे दागिने या व्यापार्यास पोलिसांनी जसेच्या तसे परत केले. संदीप जैन हे सोने-चांदी दागिन्यांचे व्यापारी घाटकोपर येथे राहतात. १३५ ग्रॅम वजनाचे तयार दागिने बॅगमध्ये घेऊन ते मुंब्रा (अमृतनगर) येथील व्यापार्यास देण्यास निघाले. बुधवारी सकाळी १0.२५ ची लोकल पकडून मुंब्राच्या दिशेने निघाले. मुंब्रा स्टेशन येतात घाई-गडबडीत उतरलेल्या जैन यांना दागिन्यांची बॅग लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आले, मात्र त्यांनी रेल्वेच्या हेल्पलाइनला तत्काळ फोन करून माहिती दिली. हेल्पलाइनने कल्याण रेल्वे पोलिसांना तसे कळवले. कल्याण स्टेशनवर लोकल येताच पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यानंतर ही बॅग संदीप जैन यांना परत केली. जैन यांनी हेल्पलाइन आणि प्रामाणिक पोलिसांचे आभार मानले.


No comments:
Post a Comment