2/1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : १९व्या शतकात स्त्रियांच्या शैक्षणिक-सामाजिक विकासासाठी झटलेल्या, स्त्री-उद्धारक, युग प्रवर्तक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी येथे ३ जानेवारी रोजी स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लुम्बिनी बुद्ध विहार, अशोकनगर, मरोळ पाईप लाईन, अंधेरी (पूर्व), मुंबई-५९ येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सचिव वर्षा विद्या विलास, अँड़ संगीता मुसळे, प्रा. निलिमा पवार, नगरसेविका स्मिता सावंत आदी चर्चासत्रामध्ये आपले विचार मांडणार आहेत. भीमराव गमरे आणि स्मिता धोत्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १0 ते रात्रौ १0 वा.पर्यंत व्यसन मुक्तीवर भव्य पोस्टर प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच दुपारी ३ ते सायं. ५ वा.पर्यंत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. ५ ते ६ पर्यंत समता युवा मंचच्या महिला मंडळाच्या वतीने क्रांतिकारी गीतांनी सावित्रीमार्ईंना अभिवादन करण्यात येणार आहे. या प्रसंगी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ, महिलांचे स्नेहसंमेलन आणि महिलांच्या विविध समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment