शिवसेनेच्या लेटलतिफ नगरसेवकांना दट्टय़ा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2014

शिवसेनेच्या लेटलतिफ नगरसेवकांना दट्टय़ा

2/1/2014  http://jpnnews.webs.com
मुंबई : शिवसेनेने मुंबई मनपातील आपले लेटलतिफ सदस्य-नगरसेवकांवर दट्टय़ा फिरवला आहे. पालिकेची सर्वसाधारण सभा, विविध समित्यांच्या बैठकांना वेळेवर उपस्थित राहण्यास वरिष्ठ पातळीवरून फर्मावण्यात आले आहे. बेस्ट अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा होऊन त्यास मंजुरी मिळावी यासाठी पक्षादेश काढण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे काही सदस्य सभागृहात, स्थायी, सुधार, बेस्ट तसेच अन्य समितींच्या बैठकांना विलंबाने येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या लेटलतिफ सदस्यांना बैठकींना वेळेवर उपस्थित राहण्याचे फर्मान सभागृह नेते यशोधर फणसे यांनी काढले आहे. याबाबतचे पत्रच सदस्यांना पाठवण्यात आले आहे. येत्या ७ जानेवारी रोजी पािलकेची सर्वसाधारण सभा दुपारी अडीच वाजता होणार आहे. या वेळी सभागृहात बेस्टचा वर्ष २0१४-१५चा अर्थसंकल्प मंजूर होण्यासाठी सादर करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या सदस्यांची दुपारी साडेबारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीस बेस्ट अर्थसंकल्पावरील चर्चा व अर्थसंकल्प मंजूर करण्याबाबत महापौर सुनील प्रभू यांच्यासह सभागृह नेते यशोधर फणसे मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS