महिलांच्या सुरक्षेसाठी एस ४ यू अँप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2014

महिलांच्या सुरक्षेसाठी एस ४ यू अँप

मुंबई : महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेच्या वतीने एस ४ यू हे अँप विकसित करण्यात आले असून संकट समयी महिलांना या सुविधेमुळे तातडीने मदत पुरवणे शक्य होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले. 

कोणत्याही अँण्ड्रॉईड फोनवरून हे अँप वापरता येईल. ते सध्या शिवसेनेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. एका आठवड्यात ते गुगल प्लेमधूनही उपलब्ध होईल. एखादी महिला संकटात असेल व तिने या अँपच्या शॉर्ट मेनूवर बोट ठेवल्यास एकाच वेळी स्थानिक पोलिसांसह निवडलेल्या १0 व्यक्तींना ही व्यक्ती संकटात असल्याचे लघुसंदेश आपोआप पाठवण्यात येतील. तसेच संकटात सापडलेल्या या व्यक्तीचे नेमके ठिकाणही समजणार असल्याने तिला तातडीने मदत मिळणार आहे. एस ४ यू म्हणजेच शिवसेना फॉर यू असे या अँपचे नाव ठेवण्यात आले असून २३ जानेवारी रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचे उद््घाटन होणार आहे, असे शेवाळे यांनी सांगितले. या यंत्रणेचा नंतर अन्य नागरिकांसाठीदेखील वापर करण्यात येणार असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS