मुंबई : देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल, याचा निर्णय विविध राज्यांचे मुख्यमंत्रीच करतील. देशाचा पंतप्रधान मोठय़ा पक्षांचा नसेल, असे भाकीत भारिप-बहुजन पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केले. प्रस्थापित राजकीय पक्षांना जनता या वेळी नाकारेल. उत्तर प्रदेशात अपना दलाच्या पुढाकाराने एकत्र आलेले पाच पक्ष, दिल्लीत आम आदमी पार्टी, असे अनेक नवे पक्ष विविध राज्यांत पुढे आलेले आहेत. त्यांना जनता निवडून देईल. डाव्या पक्षांनी तिसरी आघाडी करण्यात या आधीच पुढाकार घ्यायला हवा होता. तो त्यांनी घेतला नाही. त्यामुळे अडचण झाली आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी पत्नकारांशी बोलताना सांगितले. आपण अकोला येथून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा आमची आघाडी लढवेल, असेही त्यांनी सांगितले. आदर्श घोटाळ्याच्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीत राज्य सरकारने पावले उचलायला हवी होती. त्यांनी तसा निर्णय घ्यावा म्हणून २३ जानेवारीपासून भारिप-बहुजन महासंघ आंदोलन सुरू करणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
Post Top Ad
21 January 2014
Home
Unlabelled
पुढचा पंतप्रधान छोट्या पक्षाचाच - प्रकाश आंबेडकर
पुढचा पंतप्रधान छोट्या पक्षाचाच - प्रकाश आंबेडकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment