मुंबई : 'एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत' असे घोषवाक्य असणार्या सॅटर्डे क्लब या संस्थेच्या वतीने १0 ते ११ जानेवारीदरम्यान उद्योग बोध या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधवराव भिडे यांनी प्रेस क्लब येथे सोमवारी दिली. नोकरी न करता उद्योग करा, असेही संस्था नेहमी सांगत आलेली आहे. ज्यांना उद्योग करण्याची इच्छा आहे, अशा लोकांना मदत करणे, त्यांच्या विचारांचा, कौशल्याचा वापर क्लबच्या इतर सदस्यांना करून देणे तसेच संबंधित उद्योजकाला सर्वतोपरी मदत करणे हाच उद्देश क्लबचा आहे. उद्योगाच्या यशाचे गमक काय? या व आदी प्रश्नांची उत्तरे या वेळी मिळणार असून त्याबाबत विचार करता येणार आहे. देशविदेशातून आलेले उद्योजक आपल्याला यश कसे मिळाले, याची माहिती या वेळी उपस्थितांना देतील. फिनिक्स हॉल, भांडुप येथे ही परिषद होत आहे. आयटी नियोजन, रिस्क मॅनेजमेण्ट, जाहिरात, कॉर्पोरेट, उद्योग वाढ आदी विषयातील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
Post Top Ad
07 January 2014
Home
Unlabelled
उद्योग बोध आंतरराष्ट्रीय परिषद
उद्योग बोध आंतरराष्ट्रीय परिषद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment