मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या नियुक्तीसंदर्भात पत्रकार परिषदेत प्रश्नचिन्ह निर्माण केल्याबद्दल तसेच विद्यापीठातील गैरव्यवहारांवर टीका केल्याबद्दल अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांना विद्यापीठाने निलंबित केले. या पार्श्वभूमीवर मुंबई युनिव्हर्सिटी अँण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन अर्थात मुक्ता संघटनेच्या वतीने कुलगुरूंनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुलगुरूंना विरोध दर्शवण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या गेटवर करण्यात आलेल्या आंदोलनात मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी प्रा. डॉ. हातेकर यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी मुक्ताने कुलगुरूंकडे एका निवेदनाद्वारे केली.
Post Top Ad
07 January 2014
Home
Unlabelled
कुलगुरूंकडून अधिकाराचा गैरवापर
कुलगुरूंकडून अधिकाराचा गैरवापर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment