पुढील वर्षापासून कायमस्वरूपी पीएफ नंबर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 January 2014

पुढील वर्षापासून कायमस्वरूपी पीएफ नंबर

18/1/2014
नवी दिल्ली : नोकरी बदलल्यानंतरही पूर्वीचाच पीएफ नंबर कायम राहील, अशी पीएफ नंबर पोर्टेबिलिटी पद्धत २0१४-१५ वर्षात अस्तित्वात येईल. या पद्धतीचा लाभ देशातील पाच कोटी कामगारांना होईल. यामुळे नोकरी बदलल्यानंतर पीएफ रक्कम नव्या कंपनीत हस्तांतरित करणे शक्य होणार आहे. पीएफ नंबर पोर्टेबिलिटी पद्धतीमुळे कामगारांची सामाजिक सुरक्षितता वाढीस लागेल. म्हणून केंद्रीय श्रम मंत्रालयाने हे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला असून तो ईपीएफओ संस्थेकडे सादर केला आहे. या आराखड्यानुसार ईपीएफओला प्रत्येक कामगाराला एक कायमस्वरूपी पीएफ खाते क्रमांक द्यायचा आहे. यासाठी ईपीएफओला कोअर बँकिंग समान तंत्रज्ञान व्यवस्था करावी लागणार आहे. ईपीएफओला यासाठी एक केंद्रीय सर्व्हर स्थापन करून तो १२३ कार्यालयांशी संलग्न करण्याची गरज आहे. अशी व्यवस्था २0१४-१५ पर्यंत निर्माण करणे कठीण नाही, असे श्रम मंत्रालयाचे म्हणणे आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार एखादा कामगार जितक्या वेळा नोकरी बदलतो तितक्या वेळा त्याचा पीएफ खाते क्रमांक बदलतो. ही पद्धत कामगारांसाठी फारच त्रासदायक आहे. प्रोव्हिडंट फंड नंबर पोर्टेबिलिटी पद्धत अस्तित्वात आल्यास कामगारांची या त्रासातून मुक्तता होणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS