14/1/2014
मुंबई : नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आम आदमी' पार्टीला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. देशात परिवर्तन होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल व त्यांच्या सर्मथकांकडून योग्य दिशेने कार्य चालू आहे. 'आप'ची ध्येय-धोरणे लक्षात घेऊन आपण त्यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा मेधाताईंनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. त्या दिल्लीत होणार्या बैठकीत पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.
आदर्श, लवासा आदी घोटाळ्यांमुळे महाराष्ट्रावर भ्रष्टाचाराचा डाग पडला आहे. राज्याला भ्रष्टमुक्त करण्यासाठी 'आप'ला सहकार्य करणार असल्याचे मेधाताईंनी स्पष्ट केले. त्यांनी या वेळी 'आप'मध्ये प्रवेश केल्याचे जाहीर न करता जनआंदोलनाचे काम स्वतंत्ररीत्या सुरू राहणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला 'आप'चे मुंबई संयोजक मयांक गांधी, अंजली दमानिया आदी पदाधिकारी उपस्थित होते. मेधाताई पुढे म्हणाल्या, 'आम आदमी'साठी जनआंदोलने सुरू राहणे आवश्यकच आहे. केजरीवाल हे 'आप'चे सक्षम नेतृत्व असून त्यांच्या मदतीने जनआंदोलनाचा लढा उभारू. 'आप' हा भ्रष्टाचार आणि व्हीआयपी परंपरेविरोधातील पक्ष आहे. सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यासमोर ठेवूनच हा पक्ष वाटचाल करत असल्याची स्तुती त्यांनी केली. येत्या १६ व १७ जानेवारी रोजी दिल्लीत होणार्या 'नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुव्हमेंट्स'च्या (एनएपीएम) राष्ट्रीय बैठकीत आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे मेधाताईंनी स्पष्ट केले. या वेळी मयांक गांधी यांनी मेधाताईंच्या संपूर्ण सहकार्याचे स्वागत केले. मैदानातील लढाई लढून न्याय मिळत नाही म्हणून आता संसदेत लढायचे आहे. यासाठी सर्वांनी 'आप'मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी मेधाताईंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मार्मिक टिप्पणी केली. येथील राजकारणात ना 'राज' है, ना 'नीती' है, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्त्वाच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रात 'आप'ला मोठे बळ प्राप्त होणार आहे, तर 'आप'ला राज्यात एक नवा मराठी चेहरा मिळाल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे.

No comments:
Post a Comment