अजंठा-वेरूळ विकासासाठी द. कोरियाकडे एमटीडीसीचा प्रस्ताव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2014

अजंठा-वेरूळ विकासासाठी द. कोरियाकडे एमटीडीसीचा प्रस्ताव



महाराष्ट्रात बौद्धविहार आणि संशोधन केंद्र सुरू होण्याची शक्यता 
13/1/2014
मुंबई : दक्षिण कोरियाशी भारताचे एक सांस्कृतिक नाते निर्माण होणार आहे. यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असेल, अजंठा-वेरूळ या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी दक्षिण कोरियाकडून बौद्धविहार आणि संशोधन केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव एमटीडीसीने दक्षिण कोरियाच्या मुंबईत आलेल्या शिष्टमंडळास दिला आहे.

महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याशी दक्षिण कोरियाचे सहकार्य विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये आहे. दोन्ही सरकारे आता पर्यटन क्षेत्रास चालना देण्याच्या प्रयत्नात आहेत. दक्षिण कोरियाची लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून त्यात बहुसंख्य बौद्ध धर्माचे पालन करतात.

महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मुल्लिक यांनी एमटीडीसीच्या काही अधिकार्‍यांसह दक्षिण कोरियाच्या मुंबईत आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेनंतर बोलताना ते म्हणाले की, उभय देशांदरम्यान परस्पर सहकार्याचा मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात अनेक पर्यटन केंद्रे आहेत ज्याचा संबंध बौद्ध परंपरेशी आहे. अजंठा आणि वेरूळ या दोन्ही ठिकाणांचा संबंध धर्माच्या परंपरांशी आहे. त्यामुळेच दक्षिण कोरियाकडून अशा प्रकल्पासाठी नजीकच्या परिसरात जमीनही देता येईल. 

राज्य सरकारच्या या प्रस्तावास दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला. यापुढे जाऊन सुचवले की, वैद्यकीय पर्यटनासाठी त्यामुळे चालना मिळेल. दक्षिण कोरिया आणि जवळच्या देशातील लोकांना प्लास्टिक सर्जरीसारख्या प्रक्रियांचे मोठे आकर्षण आहे, त्यामुळे प्लास्टिक सर्जरीसाठी येणार्‍यांना पर्यटनाचा लाभ घेता येईल,यासाठी पॅकेजही तयार करता येईल. एमटीडीसीच्या सहकार्याने दक्षिण कोरियास तेथील पर्यटनास चालना देता येईल, असेही या वेळी सुचवण्यात आले. यासंदर्भात लवकरच सहकार्याचा करार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS