मुंबई मेट्रो असणार अत्याधुनिक सुविधांनी युक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2014

मुंबई मेट्रो असणार अत्याधुनिक सुविधांनी युक्त

14/1/2014
मुंबई : वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रोच्या लोकार्पणाची चाहूल लागल्यामुळे मेट्रोच्या अंतर्गत सेवासुविधांवर विशेष लक्ष पुरविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. मेट्रो डब्यांमधील स्पिकर्स, सीसीटीव्ही तसेच संपर्क सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानानी युक्त असणार आहेत. त्याचबरोबर वयोवृद्ध तसेच विकलांग व्यक्तींसाठी मेट्रो स्थानकांवर वेगळी सुविधा असणार आहे. 

स्थानकांवर स्वतंत्र रॅम्प असून ते मूळ मार्गापासून एलिवेटेड पोडिअमपर्यंत असणार आहे. एलिवेटेड दाराचे आकार हे व्हिलचेअरला अनुसरून असणार आहेत.त्याचबरोबर या लिफ्टमधील सर्व बटन्स ही ब्रेल लिपीमध्ये असून सर्व स्थानकांवर ही सुविधा असणार आहे. त्याचबरोबर सर्व माहिती दृष्टिदोष असणार्‍यांसाठी अनाऊन्स करण्यात येणार आहेत. तसेच मेट्रो ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यातील अंतर कमी असणार आहे. तर मेट्रो डब्यांच्या अंतर्गत बाजूस असणारे कोचेस यांच्यातील अंतर व्हिलचेअर्सनुसार असणार आहे. तर मेट्रोच्या प्रत्येक डब्यात इंटरकॉम प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर अपंग व अंध, मुक्या प्रवाशासांठी स्थानकांचे नाव, डोअर साईडयांची घोषणा करण्यात येणार आहे. तर प्रत्येक स्थानकावर प्रवाशांच्या सोयीनुसार तिकिटाचे मशीन्स बसविण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुखद आणि सुसह्य व्हावा यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून लक्ष पुरविण्यात येत असून तो प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी आंतराष्ट्रीय दर्जाच्या अनेक अद्ययावत यंत्रणा मेट्रो रेल्वेमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS