मेट्रो, मोनो झळकणार प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 January 2014

मेट्रो, मोनो झळकणार प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात

15/1/2014
मुंबई : निवडणुकीची पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच मरिन ड्राइव्ह येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडणार्‍या संचलनात महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार्‍या मेट्रो रेल्वे आणि मोनोरेल प्रकल्पांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत. या महत्त्वाच्या चित्ररथांबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे चित्ररथ आणि हवाईदल व नौदलाचे चित्तथरारक प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क ते पाच उद्यान या दरम्यान पोलीस, फायरब्रिगेड, एनसीसी या सुरक्षा विभागांचे संचलन, हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके यांचा सहभाग या सोहळ्यात असे. त्यासाठी संपूर्ण दादर परिसरात बच्चे कंपनीसह सार्‍यांकडून या दलांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले जात असे. मात्र बदलत्या काळानुसार संचलन पाहण्यासाठी सर्वसामान्यांचा उत्साह मावळल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पार पडणारा प्रजासत्ताक दिन हा शासनासाठी गुणपत्रिका ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध यशस्वी प्रकल्पांचा गौरव चित्ररथांच्या माध्यामतून करण्यात येणार असून सर्वसामान्यांसाठी हे चित्ररथ पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यंदा ५0 ते ६0 चित्ररथांचा समावेश या संचलनात असण्याची शक्यता असून त्यात कृषी विभाग, पोलीस विभागासह अन्य सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सी-लिंक, एमएमआरडीएचे मेट्रो-मोनो रेल्वे, विद्युत मंडळ असे चित्ररथ असणार आहेत. यानिमित्ताने हवाई दलाच्या सुखोई विमानाचे थरार, नौदलांची प्रात्यक्षिकेही संचलनात पाहायला मिळणार आहेत.मरीन ड्राईव्ह येथे पार पडणार्‍या या संचलनात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात चित्ररथ आणि प्रात्यक्षिकांचा सोहळा रंगणार आहे. यानिमित्ताने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या कामाचा ठसा राज्य शासन आणखी गडद करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS