17/1/2014
मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी वाशी येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहे. त्याचबरोबर ३ फेब्रुवारी २0१४ पासून चालू होणार्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्यावरही शिक्षक संघटना ठाम असून त्यामुळे राज्य सरकारपुढे पुन्हा एकदा मोठा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्य सरकारला विशेष बैठक घेऊन तोडगा काढावा लागणार आहे.
गेल्या वर्षीही याच मुद्दय़ावरून राज्य सरकारची कोंडी झाली होती. त्यामुळे अखेर शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला होता.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गेल्या वर्षी १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बहिष्कार टाकला होता.
राज्य शासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर १३ मार्च २0१३ रोजी आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र राज्य शासनाने अद्याप आपले आश्वासन पाळले नसल्यामुळे शिक्षक महासंघाने १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अनेक वेळा भेटून तसेच निवेदने देऊन आश्वासनांची पूर्तता करण्याची विनंती महासंघाने केली. त्याचबरोबर ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून कामे केली.

मात्र राज्यभर अशाप्रकारे आंदोलने करूनही राज्य शासनाने कुठलीही भूमिका घेतलेली नाही. नऊ महिने झाले तरीही कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याची भावना शिक्षक महासंघाने व्यक्त केली आहे. १ जानेवारी १९९६ पासून त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करणे, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा करणे, २00८-0९ पासूनच्या वाढीव पदांना मान्यता देणे, कायम विनाअनुदान तत्त्व रद्द करणे, विज्ञानाच्या लेखी परीक्षेचे पूर्वीप्रमाणेच प्रत्येक विषयासाठी दोन स्वतंत्र पेपर घ्यावेत आदी महासंघाच्या प्रमुख मागण्या आहेत.

No comments:
Post a Comment