पालिका शाळांतील विद्यार्थी चिक्कीपासून वंचित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2014

पालिका शाळांतील विद्यार्थी चिक्कीपासून वंचित

14/1/2014
मुंबई : पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुगंधित दुधाऐवजी चिक्की देण्याचा निर्णय घेतला असला तरी दरदिवशी १९ टन चिक्की उपलब्ध करण्यासाठी एकही कंपनी पुढे न आल्याने विद्यार्थी चिक्कीपासून वंचित आहेत. दरम्यान, एका दिवसात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चिक्की उपलब्ध करणे एखाद्या कंपनीला शक्य नसेल तर पालिकेचे चिक्कीचे कंत्राट तीन कंपन्यांना द्यावे, असे शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी सांगितले. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून सुगंधित दुधाचा पुरवठा करण्यात येत असे; परंतु काही विद्यार्थ्यांना दूध बाधत असल्याच्या घटना सातत्याने होऊ लागल्याने अखेर पालिका प्रशासनाने सातत्याने होऊ लागल्याने अखेर पालिका प्रशासनाने सुगंधित दुधाचा पुरवठा बंद के ला. त्याऐवजी विद्यार्थ्यांना बिस्कीट अथवा चिक्की देण्याचा पर्याय पुढे आणला. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना चिक्कीचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शैक्षणिक वष्रे सुरू होऊन ५ महिने उलटले ती अद्यापि विद्यार्थ्यांना चिक्की मिळालेली नाही. कारण दररोज १९ टन चिक्की उपलब्ध करणारी एकही कंपनी अद्यापि मिळाली नाही. दरम्यान, १९ टन चिक्की कोणतीही कंपनी एका दिवसात देऊ शकत नसेल तर शहर पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना चिक्की पुरवण्यासाठी पालिकेने ३ कंपन्यांना कंत्राट द्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना दररोज चिक्कीचे वाटप करणे सोयीचे होईल, असे कोटक यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS