14/1/2014
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक ५ किंवा ६ टप्प्यांत होणार असून या संदर्भातील तारखांची घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी दिली.
निवडणूक तारखांची घोषणा मागील सार्वत्रिक निवडणुकांसारखीच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त एस. एस. ब्रह्म यांनी सोमवारी दिली. यंदाची सार्वत्रिक निवडणूक ६ टप्प्यांत होईल, असे स्पष्ट संकेतही त्यांनी या वेळी दिले. २00९च्या सार्वत्रिक निवडणुका ५ टप्प्यांत घेण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा त्या ६ टप्प्यांत घेण्याचा विचार सुरू आहे. गृहमंत्रालयासोबतच्या बैठकीनंतर आणि देशभरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ब्रह्म म्हणाले. निवडणुकीची प्राथमिक तयारी यापूर्वीच वेगाने सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांच्या तारखा पुढील महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीस जारी करण्यात येतील, असे सांगत त्यांनी या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका करताना उमेदवारांना यंदा र्मयादा पाळावी लागेल, असे सूचक वक्तव्य केले.दरम्यान, निवडणुकांपूर्वी वर्तवण्यात येणार्या जनमत चाचण्यांवर बंदी लादली गेली पाहिजे, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment