उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सतीशकुमार सिंह या व्यक्तीने न्यायाधीश असल्याचा बनाव करुन सरकारी कर्मचा-यांकडून पैसे वसूल केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तो आम आदमी पार्टीचा कार्यकर्त्या असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्यावर सरकारी कर्मचा-यांकडून अवैध मार्गाने पैसे वसुल करणे आणि पोलिस खाते व प्रशासकीय अधिका-यांवर त्यांच्या कनिष्ठ अधिका-यांच्या बदलीसाठी दबाव आणण्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गाझियाबाद पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई विवेक रैनाला निलंबित करुन अटक केले आहे.
पोलिसांनी सांगितले, की आरोपी सतीशकुमार सिंह हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याकडे आपच्या सदस्यत्वाची पावती सापडली आहे. त्याचा रजिस्टेशन क्रमांक 1628902 आहे. सतीशकुमार सिंह याने याआधी स्वतःला टाइम्स ऑफ इंडियाचा पत्रकार असल्याचे सांगत डीजीपी ब्रिजलाल यांना फॅक्स करुन एका पोलिस अधिका-याची बदली दुस-या जिल्ह्यात करण्याचा फॅक्स केला होता.
गाझियाबादचे पोलिस अधिक्षक धर्मेंद्र सिंह म्हणाले, आरोपी सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिका-यांना हव्या असलेल्या ठिकाणी पोस्टिंग करुन देण्याचे अमिष देऊन पैसे उकळतो. तोतया न्यायाधीश सतीशकुमार सिंह प्रकरणावर दिल्लीचे शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया म्हणाले, पक्षाचे सदस्यत्व कोणीही घेऊ शकते. जर ती व्यक्ती दोषी असेल तर, त्याला शिक्षा झालीच पाहिजे.


No comments:
Post a Comment