मुंबई : शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळ महिला हक्क कल्याण समितीच्या अध्यक्षा निर्मला गावीत व सदस्यांनी बुधवारी पालिका मुख्यालयाला भेट देऊन शीतल म्हात्रे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेविका तसेच पालिकेतील महिला कर्मचार्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या प्रसंगी मनपा आयुक्त सीताराम कुंटे, महिला व समाजकल्याण समिती (पालिका) अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर, माजी अध्यक्षा फाल्गुनी दवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात केलेल्या आरोपां प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन अद्यापि त्यांना अटक करण्यात आली नसल्याची तक्रार या वेळी शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केली. तसेच पालिकेत महिला नगरसेविकांच्या हक्क, समस्या, तक्रारींबाबत एक सर्वपक्षीय महिला हक्क समिती निर्माण करण्याची मागणी शीतल म्हात्रे व अन्य सदस्यांनी केली. महिला नगरसेविका, महिला अधिकारी, कर्मचार्यांचे गार्हाणे ऐकल्यानंतर याप्रकरणी एका आठवड्यात अहवाल तयार करून विधिमंडळ सभापतींना देण्यात येईल, असे समितीतर्फे सांगण्यात आले.


No comments:
Post a Comment