उच्च दाब वाहिन्यांजवळ पतंग उडवणे टाळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2014

उच्च दाब वाहिन्यांजवळ पतंग उडवणे टाळा

11/1/2014
मुंबई : मुंबईकरांना तसेच आपल्या २८ लाख वीज ग्राहकांना संक्रातीच्या शुभेच्छा देतानाच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या उपनगरातून वीजपुरवठा करणार्‍या कंपनीने पतंग उडवणार्‍यांना विजेच्या उच्च दाब पारेषण वाहिन्यांनजीक पतंग उडवणे टाळण्याबाबत आवाहन केले आहे.

संक्रातीचा सण साजरा होत असताना मोठय़ा प्रमाणावर पतंग उडविण्यात येतात. पतंग उडवताना विजेच्या उच्च दाब पारेषण वाहिन्यांच्या संपर्कात आल्यास जीवित या वित्तहानी तसेच मोठय़ा प्रमाणावर वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पतंग उडविण्यासाठी जो मांजा वापरला जातो त्यावर कोटिंगसाठी वापरण्यात येणार्‍या धातू पावडरमधून विजेची वहन होण्याची शक्यता असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. मांजा २२0,000 व्होल्ट इतक्या उच्च दाबाच्या पारेषण वाहिनीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात आल्यास अपघात घडू शकतो. त्यामुळे रिलायन्सकडून पतंग उडवण्याचा आनंद लुटणार्‍या मुंबईकरांना विशेषत: वर्साेवा, ओशिवरा, मालाड, गोरेगाव या पश्‍चिम उपनगरातील तसेच विक्रोळी, चेंबूर इत्यादी पूर्व उपनगरातील मुंबईकरांना उच्च दाब वाहिन्यांच्या नजीक पतंग उडवणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS