१ फेब्रुवारीला मोनोरेलचे उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2014

१ फेब्रुवारीला मोनोरेलचे उद्घाटन

मुंबई : चेंबूर ते वडाळा या देशातील पहिल्या मोनोरेलचे उद्घाटन १ फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते चेंबूर महात्मा गांधी मैदान येथे दुपारी ३.३0 वाजता होणार आहे. रविवार, २ फेब्रुवारीपासून सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मोनोरेल सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी असणार असून स्थानिक आमदार, खासदार., मुंबईचे महापौर उपस्थित राहणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. 

४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा १00 मीटरची ट्रायल रन पार पडल्यानंतर आणि विविध प्रमाणपत्रांच्या फेर्‍यांनंतर अखेर २ फेब्रुवारीपासून मोनोरेल सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. वातानुकूलित डबे, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, पहिल्या डब्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत जाण्यासाठी वेस्टिब्यूल, तिकिटे आणि स्मार्ट कार्ड, प्रत्येक डब्यातून प्रवाशांना मोनोरेल पायलटकडे मदत मागण्यासाठी डायरेक्ट स्पिकर्स, प्रत्येक स्थानकामध्ये स्वयंचलित दरवाजे ही वैशिष्ट्ये आहेत. 

चेंबूर-वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या देशातील पहिल्या मोनोरेलचा पहिला टप्पा चेंबूरते वडाळा हा ८.८ किमीचा मार्ग लोकार्पणानंतर सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. रविवारपासून सकाळी ७ ते दुपारी ३ व एक महिन्याच्या कालावधीनंतर दोन शिफ्टनुसार मोनोरेल सुरू करण्यात येणार आहे. मोनोरेलची क्षमता ५६0 प्रवाशांची असून पूर्ण वेळ मोनोरेल सुरू झाल्यानंतर सकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत मोनोरेल चालविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे तिकीट ५ रुपये ते ११ रुपये असणार असून रविवारी पहिल्याच दिवशी उत्सुकतेपोटी बच्चे कंपनीसह सर्वांचीच गर्दी मोनोरेल स्थानकांवर होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS