मुंबई : बेस्टमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २0१३ या तीन महिन्यांत २७ हजार २७ फुकटे प्रवासी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून १९ लाख ८ हजार ५७५ एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आहे. तीन महिन्यांत २७ हजार फुकटे प्रवासी 8१९ लाखांचा दंड वसूलमुंबईकरांची सेकंड लाइफलाइन म्हणून बेस्ट बसला ओळखले जाते. दररोज सुमारे ४0 लाख मुंबईकर या बेस्ट बसने प्रवास करतात. बसमधून प्रवास करीत असताना गर्दीचा फ ायदा घेत अनेक प्रवासी विदाऊट तिकीट प्रवास करतात. अशा विदाऊट तिकीट प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांविरुद्ध तसेच खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित के लेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध बेस्ट प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याअंतर्गत ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २0१३ या तीन महिन्यांत २७ हजार २७ फुकटे प्रवासी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून १९ लाख ८ हजार ५७५ एवढी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे.
Post Top Ad
31 January 2014
Home
Unlabelled
बेस्टमध्ये २७ हजार २७ फुकटे प्रवासी पकडले
बेस्टमध्ये २७ हजार २७ फुकटे प्रवासी पकडले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment