पालिकेच्या बोधचिन्हाचा अनधिकृत वापर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2014

पालिकेच्या बोधचिन्हाचा अनधिकृत वापर

मुंबई : खाजगी संस्थेने आयोजित केलेल्या फ्लॉवर आणि प्लांट शोच्या जाहिरातीत मुंबई मनपाची परवानगी न घेता वृक्ष प्राधिकरण समितीचा उल्लेख आणि पालिकेच्या बोधचिन्हाचा अनधिकृतपणे वापर केल्याचा आरोप पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अभिजीत चव्हाण यांनी केला आहे.

मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा आणि शायना एन. सी यांच्या आय लव्ह मुंबई कमिटी यांच्या सहयोगाने क्लासिक ग्रीन वर्ल्ड नर्सरी अँण्ड लँडस्केप असेसिएशन यांनी आयोजित केलेल्या फ्लॉवर आणि प्लांट शोचे १५ ते १८ जानेवारी रोजी इस्लाम जिमखाना व ३0 जानेवारी ते २ फेब्रुवारी २0१४ रोजी जुहू येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माहितीमध्ये पालिकेची परवानगी न घेता वृक्ष प्राधिकरण समितीचे नाव व बोधचिन्ह वापरले. याबाबत आपण संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला तसेच उद्यान अधीक्षक प्रकाश खोंडे, पालिका सचिव नारायण पगडे आणि पालकिा उपायुक्त एस. एस. शिंदे यांच्या लक्षातही हा प्रकार आणला, मात्र याची त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले, असेही चव्हाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS