13/1/2014
मुंबई : उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांच्या प्रभावामुळे मुंबई शहर व उपनगरात दाखल झालेल्या कडाक्याच्या थंडीने रविवारीही मुंबईकरांना हुडहुडी भरवली. शनिवारी चालू हंगामातील सर्वात खालची पातळी गाठणार्या किमान तापमानाची दुसर्या दिवशी अर्थात मुंबईकरांचा 'हॉलीडे' असलेल्या रविवारी १३.७ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. पुढील दोन-तीन दिवस शहरात थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मागील काही दिवस १६ ते १८ अंशांच्या दरम्यान सरासरी राखणार्या किमान तापमानाने विक्रमी घसरण केल्यामुळे मुंबईकर चांगलेच गारठले. गेले दोन दिवस शहरात थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे हवेतील सुखद गारव्याचा अनुभव मुंबईकर घेत असताना शनिवारी थंडीची तीव्रता आणखीन वाढली. कुलाबा वेधशाळेकडील नोंदीनुसार, रविवारी मुंबईत कमाल २६.0, तर किमान १३.७ अंश सेल्सिअस तापमान होते. शहराच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ अंशांची, तर कमाल तापमानात ४ अंशांची घसरण झाल्याने मुंबईकरांना रविवारीही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. कमाल तापमानातही घट होऊ लागल्याने दिवसभर थंडीची तीव्रता कायम राहत असल्याचे कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment