मुंबईकरांना एलिव्हेटेड प्रकल्प नको - विद्या चव्हाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2014

मुंबईकरांना एलिव्हेटेड प्रकल्प नको - विद्या चव्हाण

मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्‍या मुंबईकरांच्या अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले. तसेच उपनगरीय रेल्वे मार्गावर येऊ घातलेल्या एलिव्हेटेड प्रकल्पास आपला विरोध असल्याचे सांगत रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार आपल्या जबाबदारीची टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर येत्या दोन ते तीन दिवसात कृषीमंत्री शरद पवार यांच्या मदतीने आपण रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांना या वेळी सांगितले.

रेल्वेवर गेल्या आठवड्यात झालेल्या तीन अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईकरांना एलिव्हेटेड रेल्वेची आवश्यकता नसून त्याऐवजी रेल्वेने चांगल्या सोयी पुरवण्याची आवश्यकता असल्याचे मत आमदार विद्या चव्हाण यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुंबईकरांना सुमारे ५७ हजार कोटी रुपयांच्या एलिव्हेटेड प्रकल्पाची आवश्यकता नाही. तसेच या प्रकल्पामुळे वाहतुकीची समस्या सुटू शकत नसून प्रकल्प जितका महाग तेवढे कमिशन या वृत्तीमुळे रेल्वेतील अधिकारी हा प्रकल्प राबवत असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS