अशासकीय आयटीआय कर्मचार्‍यांचे उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2014

अशासकीय आयटीआय कर्मचार्‍यांचे उपोषण

मुंबई : अशासकीय आयटीआय कर्मचार्‍यांच्या वेतन अनुदानाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारपासून महाराष्ट्रातील सर्व खाजगी आयटीआय बेमुदत बंद ठेवून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

सुमारे ७00-८00 कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत ५१ अशासकीय आयटीआय संघटनेच्या कर्मचार्‍यांनी सोमवारपासून आझाद मैदानात वेतन अनुदानाच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यातील २000 पूर्वीच्या शासकीय आयटीआय कर्मचार्‍यांना वेतन अनुदान मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी आझाद मैदान दाणाणून गेले. इतर राज्यांनी कर्मचारी वेतन अनुदान दिलेले असतानाही आपल्या महाराष्ट्रात ते का जमू नये? अजून किती वर्षे कर्मचार्‍यांना अनुदानासाठी वाट पाहावी लागणार आहे? असा सवाल या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय बोरस्ते व कर्मचार्‍यांनी केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी अनेकदा अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव देऊनही त्याला कॅबिनेट मंत्रिमंडळ अद्याप मंजुरी देत नाही. यासारखी दुर्दैवी बाब नाही, त्यामुळे अशासकीय आयटीआय संघटनेने वेतन अनुदान मिळाल्याशिवाय आझाद मैदानातून हटणार नाही, असा निर्धार या वेळी संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS