प्रसूतीगृहांचे नूतनीकरण करणार - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2014

प्रसूतीगृहांचे नूतनीकरण करणार - महापौर

मुंबई : पालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांचे मातृत्व सुरक्षा अभियानाखाली नूतनीकरण व आरोग्य सेवा दजरेन्नतीचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी केले. मालाड (पूर्व) येथील म. वा. देसाई रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण सोहळय़ाच्या वेळी महापौर बोलत होते. उपमहापौर मोहन मिठबांवकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) मनीषा म्हैसकर, प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका व खातेप्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. सीमा मलिक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

पूर्व व पश्‍चिम उपनगरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन बृहन्मुंबई महापालिकेने आरोग्य सेवा बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारच काही रुग्णालये नव्याने बांधली तर काही रुग्णालयांचे नूतनीकरण करून विकसित करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. मालाड येथील स. का. पाटील रुग्णालयसुद्धा महापालिकाच बांधणार असून, या ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. प्रशासन व लोकप्रतिनिधी जेव्हा हातात हात घालून काम करतात तेव्हाच अनेक चांगली कामे पूर्ण होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS