पाकीट माराचा रेल्वे प्रवाशावर हल्ला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2014

पाकीट माराचा रेल्वे प्रवाशावर हल्ला

मानखुर्द /प्रतिनिधी /रशिद इनामदार
संध्याकाळच्या वेळी घरी परतण्याच्या गडबडीत असताना मानखुर्द रेल्वे स्थानक येथे पाकीट मारणे प्रवाशावर ब्लेड ने हल्ला केला . संध्याकाळी घरी परतत असलेल्या प्रवाशाचे पाकीट मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकीट,माराला तरुण प्रवाशाने रंगेहात पकडले . मानखुर्द रेल्वे स्थानक जवळ आलेले पाहून स्वतःला सोडवून पळता  यावे म्हणून पाकीट माराने प्रवाशाच्या कानाच्या मागे धारदार ब्लेड ने वार केला . या अचानक हल्ल्यात ही प्रवाशाने स्वतःला सावरले व त्यावर प्रतिहल्ला केला .पाकीट माराच्या हातातील ब्लेड ने या झटापटीत डोळ्याच्या खाली वार झाला व तो जखमी झाला . सह प्रवाशांच्या मदतीने जखमी झालेल्या पाकीटमाराला मानखुर्द रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले . दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत असताना रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले . हा प्रकार पाहणाऱ्या बघ्या प्रवाशांमुळे फलाट  क्रमांक १ वर बराच काळ गर्दी केली होती . पोलिसांनी  गर्दी पांगवली व त्या दोघांना उपचारासाठी व चौकशीसाठी ताब्यात घेतले . 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS