मुंबई : मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे मुंबई मधील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून रेडिएशनमुळे विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या १0 हजारांवर गेली आहे, असा आरोप आयआयटीचे तज्ज्ञ गिरीषकुमार यांनी केला आहे. मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे शरीरावर कोणत्याही प्रकारे घातक परिणाम होत नसल्याचा अहवाल पैसे घेऊन आयआयटीच्या काही तज्ज्ञांकडून देण्यात येत असल्याचा आरोप गिरीषकुमार यांनी केला.
मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे अनेकांना डोकेदुखी, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांनी ग्रासले आहे. नागरिकांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम होत असला तरी यामुळे कोणताही विपरित परिणाम होत नसल्याचा अहवाल पैसे घेऊन काही तज्ज्ञ मोबाइल कंपन्यांना देत आहेत. दरम्यान, मुंबई मनपाने मोबाइल टॉवरसंदर्भात नवीन पॉलिसी तयार केली असली तरी ही पॉलिसी लागू न करण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी रेडिएशनमुळे धोका नसल्याचे सांगत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी केला आहे.


No comments:
Post a Comment