8/1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई :बेस्ट प्रशासनातर्फे एरंगळ जत्रेसाठी जाणार्या भाविकांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. येत्या १२ जानेवारी रोजी (रविवारी) ही एरंगळची जत्रा होणार आहे. त्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी अशा एकूण ६0 जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.
बेस्ट प्रशासनातर्फे एरंगळ जत्रेसाठी मालाड स्थानक (पश्चिम) ते एरंगळ जत्रा आणि मार्वे बीच ते मढ जेट्टी, गायकवाड नगर ते एरंगळदरम्यान बसमार्ग क्रमांक २७१ आणि तसेच बोरिवली बसस्थानक (पश्चिम) ते मढ जेट्टीदरम्यान बसमार्ग क्रमांक २६९ या मार्गावर सकाळी २४ तर संध्याकाळी ४५ जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. या जादा बसगाड्या सकाळी ६ वाजल्यापासून सोडण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेऊन आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी मालाड स्थानक (पश्चिम), मार्वे बीच, मढ जेट्टी, एरंगळ, भाटी व्हिलेज तसेच मालवणी आगार इ. ठिकाणी वाहतूक अधिकार्यांची तसेच बस निरीक्षकांची त्याचप्रमाणे सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या जादा बसगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment