मुंबई : बसभाड्यापोटी प्रवाशांकडून बेस्ट उपक्रमाला मिळालेल्या रकमेत अनेक बनावट नोटा आढळून आल्या असून त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला २ लाख ३३ हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. बेस्ट उपक्रमाने बेस्ट समितीपुढे सादर केलेल्या प्रस्तावामुळे ही बाब उघडकीस आली. बेस्टच्या बस आगारामध्ये दररोज पहिवहन विभागाचे उत्पन्न आयसीआयसीआय आणि बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये जमा करण्यात येते. २0१२-१३ या वर्षात परिवहन विभागाकडून १ हजार २५0 कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यात १000, ५00 आणि १00 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यापैकी तिकीट विक्रीतून १ लाख ७0 हजार ९00 रुपयांच्या तर बस पास विक्रीतून मिळालेल्या रकमेत ६२ हजार ८00 रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. म्हणजेच बेस्ट उपक्रमाला २ लाख ३३ हजार ७00 रुपयांच्या बनावट नोटा तिकीट विक्रीतून मिळाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, प्रवासी तिकीट घेताना सुटे पैसे देत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी दिलेली नोट वाहक घेतात आणि तिकिटाच्या मागे शिल्लक पैसे वडाळा आगारातून घेण्यास सांगतात. परिणामी, या १000 आणि ५00 रुपयांच्या नोटा येतात, असे या वेळी बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी सांगितले.
Post Top Ad
08 January 2014
Home
Unlabelled
बनावट नोटांमुळे बेस्टला अडीच लाखांचा भुर्दंड
बनावट नोटांमुळे बेस्टला अडीच लाखांचा भुर्दंड
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment