इंटरनेटवर केंद्र सरकारची नजर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2014

इंटरनेटवर केंद्र सरकारची नजर


6 / 1 / 2014  http://jpnnews.webs.com
नवी दिल्ली : भारतात इंटरनेट आणि सोशल माध्यमांवरील स्वैराचार थांबवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि डीआरडीओने 'नेत्रा' ही नवीन हेरगिरी यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे इंटरनेट किंवा सोशल माध्यमांवर 'हल्ला', 'बॉम्ब', 'स्फोट', 'कत्तल' असे हिंसक शब्द वापरणार्‍यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर या नवीन यंत्रणेतून संदेशसुद्धा वाचता येतील.

लष्करी संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओअंतर्गत येणार्‍या सीएआयआर या संस्थेने इंटरनेट हेरगिरी यंत्रणा 'नेत्रा' विकसित केली आहे. देशभर सर्वच संरक्षण संस्थांना ही यंत्रणा वापरता यावी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालय या तंत्रास अंतिम स्वरूप देत आहे. 'नेत्रा'च्या माध्यमातून स्काईप, गुगल टॉक, ट्विटर, फेसबुक स्टेटस, ई-मेल, इन्स्टंट मेसेज, इंटरनेट कॉल, ब्लॉग, फोरम आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणार्‍या प्रत्येक संकेत आणि संभाषणाची हेरगिरी केली जाणार आहे.

गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे, या यंत्रणेवर इंटेलिजेन्स ब्युरो आणि केंद्रीय सचिवालयांनी यापूर्वीच चाचणी घेऊन मान्यता दिली. अंतर्गत मंत्रीगट, केंद्रीय सचिवालयांचे वरिष्ठ अधिकारी, गृह मंत्रालय, डीआरडीओ, सीएआयआर, आयबी, सी-डॉट आणि संगणक आपत्कालीन प्रत्याभरण दल यांनी नुकतीच बैठक घेऊन 'नेत्रा'च्या कार्यकक्षेवर चर्चा केली. या नवीन यंत्रणेच्या माध्यमातून केवळ संशयितांची हेरगिरी केली जाणार नाही. तर सर्वत्र इंटरनेट सुरक्षिततेचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, माहिती साठवण्यासाठी तीन संरक्षण संस्थांना ३00 जीबीपर्यंत माहिती साठवून ठेवण्याची परवानगी आयबी, केंद्रीय सचिवालय यांच्यासह तीन प्रमुख संस्थांना देण्यात आली आहे. तर अतिरिक्त १00 जीबीपर्यंतची जागा उर्वरित कायदा आणि सुव्यवस्था संस्थांना दिली जाईल.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS