11/1/2014
मुंबई - स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवणारे अग्निशमन जवान गेल्या दोन वर्षांपासून गणवेशापासून वंचित आहेत. अग्निशमन प्रशासनाकडे मागणी करूनही गणवेश न मिळाल्याने जवानांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गणवेशाची मागणी पूर्ण न झाल्यास १७ जानेवारीपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटस् (पीपीई) आणि ‘वुलन’चा गणवेश म्हणजे अग्निशमन जवानांची कवचकुंडले आहेत. ती परिधान करून ते आगीमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव वाचवतात. २०१०-१२ या वर्षात त्यांना पीपीई आणि गणवेश दिले गेले. २०१२-१४ मध्ये ते आंतरराष्ट्रीय दर्जानुसार देण्याचे निश्चित करूनही अद्याप दिले गेलेले नाहीत. परिणामी अनेकांना स्वखर्चाने गणवेश शिवावा लागत आहे.
अग्निशमन जवानांचे गणवेश ठेकेदाराला विकल्याप्रकरणी एका अधिकारी आणि कारकुनावर कारवाईही झाली. काही जवानांचीही चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अग्निशमन प्रशासन जबाबदार असून या प्रश्नांवर वेळीच तोडगा काढला पाहिजे अशी मागणी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, कार्याध्यक्ष शरद कुवेसकर यांनी केली आहे. जादा कामाचा भत्ता व अन्य थकबाकी मिळावी, उच्च वेतनश्रेणीत समावेश, रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत, वैद्यकीय स्मार्ट कार्ड अशाही जवानांच्या मागण्या आहेत.

No comments:
Post a Comment