आयटीआय संघटनेचे २३ आंदोलनकर्ते अत्यवस्थ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2014

आयटीआय संघटनेचे २३ आंदोलनकर्ते अत्यवस्थ

9/1/2013
मुंबई : महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळांला बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे या आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री रमेश टोपे यांनी फक्त आश्‍वासनापलिकडे आम्हाला काहीच दिले नाही. २३ आंदोलनकर्ते आझाद मैदानात अन्नपाणी न घेता अत्यावश्यक असताना सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने का पाहत नाही? असा सवाल संघटनेचे अध्यक्ष संजय बोरसे यांनी या वेळी दिला. अनुदान द्या व उपासमारी टाळा अशा प्रकारच्या पाट्या गळय़ात अडकवून आझाद मैदानात आंदोलन करत गेल्या ४ दिवसांपासून घोषणा देत, ऊन, थंडी याचा सामना करत आझाद मैदानात आम्ही न्याय मागतोय, मात्र शासनाला पाझर फुटत नाही. त्यामुळे आता ही लढाई मागे घेणार नाही, असे बोरसे म्हणाले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS