राज्यातील रोजगार व बेरोजगारांची पाहणी करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2014

राज्यातील रोजगार व बेरोजगारांची पाहणी करणार

16/1/2014
मुंबई : राज्यातील रोजगार आणि बेरोजगारांची चौथी पाहणी करण्याच्या कामास बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात नेमक्या किती व्यक्तींना रोजगार मिळाला आहे व बेरोजगारांची संख्या नेमकी किती आहे व बेरोजगारी हटविण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील, हे कळण्यास यामुळे मदत होणार आहे.

भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत ही पाहणी वर्ष २00९-१0 पासून श्रृंखला पद्धतीने घेण्यात येते. पहिली रोजगार व बेरोजगार पाहणी वर्ष २00९-१0 मध्ये, दुसरी वर्ष २0१0-११ आणि तिसरी वर्ष २0११-१२ मध्ये घेण्यात आली. चौथ्या पाहणीच्या केंद्र नमुन्याचे काम डिसेंबर २0१३ मध्ये सुरू झाले आहे. या पाहणीमध्ये राज्य स्वतंत्र नमुना निवड करून सहभागी होणार आहे. हे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत करण्यात येईल. यामुळे राज्यातील रोजगार स्थितीचा अंदाज येईल. तसेच जिल्हा स्तरावरील रोजगार स्थिती अंदाजित करण्यासाठी याचा उपयोग होईल.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS