16/1/2014
मुंबई : दरवर्षी सोडत काढण्याचा अट्टाहास, मात्र या सोडतीतील घरांच्या सुविधेकडे होत असणारे दुर्लक्ष प्रतीक्षा नगरमधील पाणी प्रश्नामुळे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मे २0११ रोजी काढलेल्या सोडतीतील १९६ पैकी १४६ सदनिकांचा ताबा सोडत विजेत्यांना देण्यात आला असून, पाणीपुरवठा मात्र अधिकृतरीत्या सुरू झालेला नाही. त्यामुळे म्हाडाने टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठय़ाची सोय केली आहे, तर कुर्ल्याच्या विनोबा भावे नगरमधील अल्प उत्पन्न गटाच्या ३९ सदनिका, मे २0१२ च्या सोडतीतील अल्प उत्पन्न गटाच्या १३७ आणि मध्यम उत्पन्न गटाच्या ८0 सदनिकांचा समावेश आहे. ओसी रखडल्यामुळे या घरांचा ताबाही देण्यात आला नव्हता. काही महिन्यांपूर्वी ओसी मिळाल्यानंतर घराचा ताबा घेऊनही मुंबई महानगरपािलकेकडून पाणीपुरवठा केलेला नाही. म्हाडाकडून केवळ पाठपुरावा करण्यात येत असून, प्रत्यक्ष पाणीपुरवठा कधी सुरू होणार हा प्रश्न अजूनही अधांतरी आहे.

No comments:
Post a Comment