मुंबई : मिठी, वाकोला नदी तसेच मोठय़ा नाल्यातील गाळ काढण्यासाठी २0१४- १५ या आर्थिक वर्षात १६ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावाला बुधवारी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
सांताक्रुझ (पूर्व) येथील वाकोला नदी प्रवाहातील, मोठय़ा नदीतील गाळ काढणे (एमएमआरडीए परिसरातील बीकेसी रोडपर्यंत) या कामासाठी पालिका २ कोटी ६९ लाख ९0 हजार ९0१ रुपये खर्च करणार आहे. तसेच सांताक्रुझ पूर्व भागातील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी (धारावी पूल ते प्रेमनगर पातमुखापर्यंत) ५ कोटी २0 लाख १ हजार ५२१ रुपये, शहर भागातील मिठी नदी, पातमुखे मोडणार्या टेल चॅनलमधील गाळ काढण्यासाठी २ कोटी ५५ लाख ९0 हजार ७२६ रुपये व शहर भागातील मिठी नदीतील गाळ काढण्याच्या (राजीव गांधी नगर व नाईक नगर पातमुखे जोडणार्या टेल चॅनेलमधील गाळ काढणे) या कामासाठी ५ कोटी ४0 लाख ३७ हजार २९८ रुपये असे एकूण १५ कोटी ८६ लाख २0 हजार ४४६ रुपये खर्च करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून आगामी स्थायी समितीच्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment