मुंबई : मुंबईकरांना गेल्या अनेक महिन्यांपासून जीची आस लागली होती ती चेंबूर ते वडाळापर्यंत धावणारी मोनो ट्रेन रविवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मोनोने प्रवास करणार्या प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी फीडर सेवा म्हणून बेस्टच्या बसला काम करावे लागणार आहे; परंतु सध्या मोनोचे वेळापत्रक आणि मोनोने किती प्रवासी प्रवास करणार याची नेमकी माहिती नसल्यामुळे बेस्ट प्रशासनाने आपली बस प्रवाशांच्या मागणीनुसार चालवण्याचे धोरण स्वीक ारले आहे.
शुक्रवारी बेस्ट समितीच्या सभेमध्ये मोनोसाठी बेस्ट प्रशासनाने काय तयारी केली आहे? असा प्रश्न विचारताच बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, बेस्ट ही प्रवाशांच्या सोयीसाठी आहे. मोनो-मेट्रोसाठी नाही. मोनोचा पहिला टप्पा हा फक्त ४.२ किमी.चा आहे. त्यामुळे मोनोने नेमके किती प्रवासी प्रवास करणार, याची माहिती नाही. त्यामुळे प्रवाशांची जशी मागणी राहील तशी बेस्टची बस चालवण्यात येईल. मोनो मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ही सेवा सुरू झाली की त्या अुनषंगाने बस सेवा पुरवण्यात येईल, अशी ग्वाही ही गुप्ता यांनी या वेळी दिली. तसेच चेंबूर व वडाळा डेपोमधून आवश्यकतेनुसार बसेस पाठवल्या जातील. याबाबतची संपूर्ण तयारी झाली असून मागणीप्रमाणे पुरवठा केला जाणार असल्याचे ही सांगितले.

No comments:
Post a Comment