शासन शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2014

शासन शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर नाही

मुंबई : शासनाने बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा २00९ मध्ये मंजूर केला; परंतु महाराष्ट्र शसानाने हा कायदा ऑक्टोबर २0११ मध्ये मान्य केला खरा, पण अजूनदेखील राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात राज्य शासनाला सपशेल अपयश आले आहे. कारण राज्यकर्ते या कायद्याच्या अंमलबजावणी बाबत गंभीर नसल्याचा घणाघाती आरोप बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेचे नेते रमेश जोशी यांनी राज्यव्यापी शिक्षण हक्क कायद्याच्या चर्चासत्रात बोलताना केला.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण सभा आणि सेंटर फॉर द पब्लिक एज्युेशन ट्रस्टच्या विद्यमाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २00९ या विषयावर दोनदिवसीय राज्यव्यापी चर्चासत्र शिक्षक सभेच्या मळवली येथील अस्मिता भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद््घाटन शिक्षक सभेचे नेते रमेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दिलीप अंधारे, राज्य नेते वि. स. घटे, राज्य सरचिटणीस प्रसाद पाटील, सेंटर फॉर पब्लिक एज्युकेशनचे कोषाध्यक्ष सुरेश गावडे, वनकार्याध्यक्षा शिल्पा नाईक, कार्यालयीन चिटणीस प्रकाश शेगुलवाडकर, पालिका शिक्षण विभागाचे विभाग निरीक्षक हेमंतकुमार भिरुड आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी रमेश जोशी यांच्या हस्ते शिक्षण हक्क कायदा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

राज्य शासन या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर नसल्याने कायदा अस्तित्वात येऊनदेखील त्याचा राज्यात उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी शिक्षक सभेला मुंबई उच्च न्यायालया याचिका दाखल करावी लागली, असे या वेळी रमेश जोशी यांनी सांगितले. राज्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळांना पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग जोडणे व वरिष्ठ प्राथमिक शाळांना सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करावेत. तसेच शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीप्रमाणे शिक्षक नियुक्त करावेत. याचप्रमाणे सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गाला पदवीधर प्रशिक्षक नियुक्त करावेत. प्राथमिक शाळामध्ये स्वच्छतेसाठी सेवक वर्गाची नियुक्ती करावी. या वर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे शाळांची सुरुवात व्हावी, असे विचार या क्षेत्रातील तज्ज्ञ तथा विभाग निरीक्षक हेमंतकुमार भिरूड यांनी व्यक्त केले. या चर्चासत्रात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील शिक्षक प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश गावडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शेगुलवाडकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS