पश्‍चिम रेल्वेवर सेल्फ अँडव्हान्स रिझर्व्हेशन काऊंटर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2014

पश्‍चिम रेल्वेवर सेल्फ अँडव्हान्स रिझर्व्हेशन काऊंटर

मुंबई : उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि तिकीट काढण्यासाठी लागणार्‍या रांगा यामधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने एक नामी योजना लढवली आहे. प्रवाशांना आता स्वत:चे तिकीट स्वत:च काढता येणार आहे. सेल्फ अँडव्हान्स रिझर्व्हेशन काऊंटर या योजनेच्या नावाखाली पश्‍चिम रेल्वेने मुंबई विभागातील २५ रेल्वे स्थानकांवर ही योजना सुरू करण्याचा निर्धार घेतला आहे. उन्हाळी सुट्टीसाठी बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांनी आतापासूनच आपले तिकीट काढण्यास सुरुवात केली आहे. त्या प्रवाशांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या २५ आणि उपनगरीय मार्गावरील १७ रेल्वे स्थानकांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. परेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, विरार, पालघर, बोईसर, डहाणू रोड, वापी, वलसाड, बिलीमोरी, नवसारी, सुरत आणि नंदुरबार या स्थानकांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. १३ फे ब्रुवारी ते १0 एप्रिलपर्यंतच ही योजना राबवण्यात येणार आहे. प्रवासी स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे तिकीट या स्पेशल काऊंटरवर काढू शकतो. सकाळी ८ ते ९.४५ वाजेपर्यंतच ही योजना सुरू असणार आहे. या स्पेशल काऊंटरचा उपयोग करण्यासाठी प्रवाशांना स्वत:चे आयडी प्रुफ रिझर्व्हेशन स्लीपसोबत जोडायचे आहे. तसेच आयडी प्रुफ व्हेरीफि केशनसाठीसुद्धा दाखवावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही खास काऊंटर देण्यात आली आहेत. महिलांसाठी चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली आणि सुरत येथे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी चर्चगेट, दादर, अंधेरी, गोरेगाव, मालाड आणि बोरिवली या स्थनाकांवर स्पेशल काऊंटर देण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकात ५ काऊंटर देण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे आरक्षण खिडक्यांवर गर्दी होणार नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS