मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून मे २0१४ साठी विरार बोळिंज येथे बांधण्यात येणार्या मध्यम उत्पन्न घरांच्या किमती ४६ लाखांच्या आसपास असून अल्प उत्पन्न गटाची घरे २६ लाखांपर्यंत असण्याची शक्यता अधिकार्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
म्हाडातर्फे मे २0१४ साठी मुंबई आणि कोकण मंडळाच्या माध्यमातून अडीच हजार घरांची सोडत काढण्यात येणार असून अजूनही घरांची संख्या निश्चित नाही. कोकण मंडळाच्या माध्यमातून विरारमध्ये अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटाच्या घरांची निर्मिती करण्यात येत आहे. बोळिंज येथे बी. जी. शिर्के कंपनीकडून ५0 इमारतींचे काम सुरू असून त्यापैकी ३३ अल्प व १७ मध्यम उत्पन्न गटाच्या इमारती असून त्यामध्ये अनुक्रमे ३५४८, १८५१ अशा एकूण ५३९९ घरांची निर्मिती होणार आहे. अल्प उत्पन्न गटाच्या घरांचे क्षेत्रफळ ३३0 चौ. फूट व मध्यम उत्पन्न गटाचे क्षेत्रफळ ६५३ चौ. फूट आहे. १३७ दुकानांचा समावेश असून वसई-विरार महानगरपालिकेने ५0 पैकी १८ इमारतींच्या १४ मजल्यांपर्यंत बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. या प्रकल्पातील सर्व इमारतींच्या बांधकामासाठी २४ मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी म्हाडाने मागितली असून नगर विकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. मे २0१४ च्या सोडतीसाठी १४ मजल्यापर्यंत परवानगी दिलेल्या इमारतीतील घरे सोडतीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यात अल्प उत्पन्न गटासाठी ११७६, मध्यम उत्पन्न गटासाठी ६३२ अशी एकूण १८0८ घरे उपलब्ध होणार आहेत. सध्या ७0 टक्के काम पूर्ण असून ३२ इमारतींचे काम तळमजला व सात मजल्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडाला नगरविकास खात्याकडून उंचीबाबत परवानगीची अपेक्षा असून ती मिळाल्यास जून २0१५ पर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असून आवश्यक त्या परवानग्या मिळवून जून २0१६ पर्यंत ताबा प्रक्रिया सुरू करण्याचा विश्वास म्हाडा कोकण मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पुष्कर सक्सेना यांनी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment