अर्थसंकल्प ३१,१७८.१९ कोटींचा / ५.७७ कोटी शिलकीचामुंबई - पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्थायी समितीत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याकडे २०१४-१५ चा ३१,१७८.१९ कोटींचा आणि ५.७७ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला, तर अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांच्याकडे २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठीचा २६६०.४४ कोटींचा आणि २.१० कोटी शिलकीचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला. २०१४-१५ चा पालिकेचा अर्थसंकल्प गतवर्षीच्या तुलनेत २७.७२ टक्क्यांनी जास्त आहे. २०१४-१५ या वर्षाचा भांडवली खर्चाचा अंदाज ११,०५१.६९ कोटी एवढा असून हा अंदाज चालू वर्षाच्या भांडवली अंदाजापेक्षा १७.९६ टक्क्यांनी जास्त आहे. २०१४-१५ चे महसुली उत्पन्नाचा अंदाज २२,१११.९७ कोटी आहे, तर महसुली खर्चाचा अंदाज २०,१२०.७३ कोटी एवढा आहे.
शिक्षणासाठी २६६०.४४ कोटीपालिकेने २०१४-२०१५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी २६६०.४४ कोटींची तरतूद केली असून यंदाचा शैक्षणिक अर्थसंकल्प २.१० कोटी इतक्या शिलकीचा आहे. २०१३-२०१४ या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १९७.५१ कोटींची वाढीव तरतूद करण्यात आली आहे.
व्हर्च्युअल क्लासरूमसाठी १२ कोटीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या ४८० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प पुढे सुरू ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात प्राथमिक शाळांसाठी ८.१२ कोटी, तर माध्यमिक शाळांसाठी ४.५० कोटी अशी एकूण १२.६२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीमपालिकेतील शाळांमधील ० ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शाळांकडून दिल्या जाणार्या विविध सुविधा ऑनलाइन देण्यासाठी पालिका ‘चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम’ विकसित करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एम.आय.एस.) असे नाव देण्यात आले आहे.
विद्यार्थी-शिक्षकांची क्षयरोग, मधुमेह चाचणीपालिका शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्यांची क्षयरोग चाचणी करून आताही विद्यार्थी आणि शिक्षकांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यार्थी-शिक्षकांची मधुमेह चाचणी करण्यात येणार आहे. या आरोग्य चाचण्यांसाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
व्हॅली क्रॉसिंग, रोप क्लायंबिंगसाठी मास्टर प्लॅनपवई येथे सात एकर जागेवर पालिकेचे हाय लेव्हल स्काऊट व गाईड शिबीर आहे. या शिबिरात रॉक क्लायंबिंग, व्हॅली क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग, रोप क्लायंबिंग सस्पेन्शन ब्रिज वॉक आणि मंकी ब्रिजसारखे साहसी खेळ शिकवले जातात. या खेळांचा विकास करण्यासाठी लॅण्ड स्कॅपिंग आर्किटेक्चरकडून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी १.०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
२५० शाळांत सेमी इंग्रजीपालिकेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे मिळावेत म्हणून यंदा २५० शाळांमध्ये सेमी इंग्रजीतून शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी १.७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
१०० शाळांमध्ये नववीचे नवीन वर्ग२०१४-१५ या आर्थिक वर्षात पालिका १०० शाळांमध्ये नववीचे नवीन वर्ग सुरू करणार आहे.
९ नवीन शाळापालिकेच्या ४ शाळांची खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. याशिवाय २३ शाळांची पुनर्बांधणी, दुरुस्ती आणि दर्जोन्नतीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत, तर २०१४-१५ या वर्षात ३८ शाळांची दुरुस्ती, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. याशिवाय खुल्या भूखंडावर शाळांसाठी नऊ नवीन इमारती बांधण्यात यणार आहेत. या सर्व कामांसाठी अर्थसंकल्पात २६६.३४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दुधाऐवजी चिक्कीसुगंधी दूध बाधत असल्याने पालिकेने सुगंधी दूध योजना गुंडाळली आहे. त्याऐवजी पालिका यंदापासून विद्यार्थ्यांना चिक्की देणार आहे. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना चिक्की देण्यासाठी अर्थसंकल्पात ७३.६६ कोटी तर माध्यमिक शाळांसाठी १०.५३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प(कोटीत)
- आरोग्य : २९०६.७३
- कचरा व्यवस्थापन : २२३६.८०
- डांबरी रस्ते : ११८०.७४
- कॉंक्रिटीकरण : ९५४.९३
- पूल : ३४५.०७
- माहिती तंत्रज्ञान : २२५.४९
- अग्निशमन दल : ३५७.६५
- मंडया : ११३.०१
- उद्यान : ५२९.८१
- पाणीपुरवठा : ६१२६.७२
- पर्जन्य जलवाहिन्या : १४७३.१८
- जलबोगदे : १०३५
- जलाशय : ३३
- उदंचन केंद्र : २३२.४१
ठळक वैशिष्ट्ये- एमएमआरडीए, म्हाडा, बीपीटी, रेल्वेच्या हद्दीतील कचरा पालिका साफ करणार.
- ‘गलिच्छ वस्ती सुधारणा कक्षा’ची स्थापना.
- करदात्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘कॉल सेंटर्स’.
- बेकायदा बांधकामांवर दंड आकारणार.
- नैसर्गिक आपत्तीत डाटा सेंटरचे कामकाज अखंडित ठेवण्यासाठी ‘डिझास्टर रिकव्हरी साइट’ तयार करणार.
- वाहनतळ धोरण.
- केबल्स वाहिन्यांसाठीचे चर भरण्याचे धोरण.
- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘थिंक टँक’.
- अंधेरी (प.) येथील मढ जेट्टी ते लिंक रोडवरील मीठ चौकी, मालाड (प.) येथील मार्वे रोड जंक्शन, गोरेगाव (प.) येथील एस. व्ही. रोड व वीर सावरकर पूल जंक्शन आणि गोवंडी शिवाजीनगर ते देवनार डंपिंगपर्यंत पूल/ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.
- विक्रोळी आणि विद्याविहार रेल्वे स्थानक येथे उड्डाणपूल बांधणार.
- गोरेगाव-मुलुंड लिंकरोडवर पादचारी पूल बांधणार.
- मिठी नदीवरील १० पुलांची पुनर्रचना.
- एव्हग्रोव्ह, क्लिव्हलँक उदंचन केंद्रे अनुक्रमे एप्रिल/जूनमध्ये मार्गी लागणार.
- गलिच्छ वस्त्यांत १५ दवाखाने बांधणार.
- खेरवाडी आणि कुर्ला बैलबाजार येथे दोन प्रसूतिगृहे.
- कुर्ला कसाईवाडा, गोवंडी, महाराष्ट्र नगर, मालवणी व पठाणवाडी येथे पाच प्रसूतिगृहे.
- माता आणि नवजात शिशूंसाठी १३० मशीन प्रसूतीशय्या, २५ मशीन आयसीयू बेड आणि बाह्यरुग्णांसाठी १३० नवीन शय्या.
- माफक दराच्या १०० डायलिसीस रुग्णशय्या.
- पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात पाच सिटीस्कॅन केंद्रे आणि तीन एमआरआय केंद्रे.
- कूपर येथे वैद्यकीय महाविद्यालय.
- भगवती आणि कस्तुरबाचा विकास.
- मध्यमवर्गीयांसाठी ५०० पेईंग बेड.
- १२ स्मशानभूमींचे ग्रीन स्मशानभूमीत रूपांतर.
- पश्चिम उपनगरात नवीन कचरा स्थानांतर केंद्र.
- चौपाट्या/समुद्राच्या सुशोभीकरणासाठी ५.२९ कोटी.
- तीन स्वयंचलित वायू सर्वेक्षण केंद्रे उभारणार.
- ५१ पाणथळ जमिनींचा विकास.
- लोअर परळ, अंधेरी, बोरिवलीत थीम पार्क.
- वाहतूक बेटे/उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभीकरण.
- दहा बीट फायर स्टेशन उभारणार.
- चार भूखंडांवर मंडया उभारणार.
- कुर्ला, गोवंडी, विक्रोळी, बोरिवली, अंधेरी आणि कन्नमवार नगरातील मंडयांचा विकास.
- अपंगांना अल्प कर्ज.
- बकरी ईद शुल्कात माफी.
- गोरेगाव टोपीवाला मंडईजवळ आणि अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुल येथे दोन नवी नाट्यगृहे बांधणार.
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी
५ लाख.
- गारगाई-पिंजाळ प्रकल्प मार्गी लावणार.

No comments:
Post a Comment