| मुंबई : हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या काही दिवसांपासून तृतीयपंथीयांनी हैदोस घातला आहे. या तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना पैशांसाठी नाहक वेठीस धरले जात असून त्यांच्या या कृत्याने या मार्गावरील प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर दुपारच्या वेळी तृतीयपंथीयांची मनमानी सुरू असते. दुपारी १२ ते ४ या वेळेत प्रामुख्याने ठाणे-वाशी व ठाणे-नेरूळ रेल्वे स्थानकांदरम्यान सर्व लोकलमध्ये हे तृतीयपंथी लोकलमध्ये चढतात व प्रवाशांकडून पैशांची मागणी करतात. अशातच एखाद्या प्रवाशाने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यास ते त्याच्यावर अपशब्दांचा प्रहार करतात. दुपारच्या लोकलमध्ये गर्दी नसल्याने अनेकदा लोकलमधील प्रवासी लहान मुले व आपल्या कुटुंबासह प्रवास करतात. या तृतीयपंथीयांची माहिती असलेले प्रवासी यांच्या नादाला लागायला नको म्हणून घाबरून त्यांना पैसे देऊन मोकळे होताना दिसतात. तर महिला डब्यात या तृतीयपंथीयांची चांगलीच दादागिरी चालते. प्रत्येक महिला प्रवाशाकडून बळजबरीने पैसे उकळले जातात. प्रत्येक डब्यात किमान दोन तृतीयपंथी चढतात. दरम्यान, रेल्वे पोलिसांकडून तृतीयपंथीयांविरोधातील कारवाई थंडावल्याने तृतीयपंथीयांची मनमानी पुन्हा सुरू झाली असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे. प्रवाशांना वेठीस धरून हैराण करणार्या या तृतीयपंथीयांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. या प्रकरणी लोकलमध्ये अशा प्रकारे तृतीयपंथी फिरत असतील व त्यांच्याकडून प्रवाशांना त्रास दिला जात असेल तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले |
Post Top Ad
06 February 2014
Home
Unlabelled
हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावर तृतीयपंथीयांचा हैदोस
हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावर तृतीयपंथीयांचा हैदोस
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment