स्वस्त घरांची अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2014

स्वस्त घरांची अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

मुंबई - गरिबांना अवघ्या 45 हजार रुपयांत घरे मिळवून देण्याची अफवा पसरवून नाहक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी मंत्रालयासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमविल्याप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पवई येथील हिरानंदानी संकुलात अवघ्या 54 हजार रुपयांत मंत्रालयातून घर मिळत असल्याची अफवा काल पसरली. या घरासाठी अर्ज करायला सबंध मुंबईतून सर्वसामान्यांची तुडुंब गर्दी मंत्रालयासमोर झाली. ही निव्वळ अफवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानंतरसुद्धा आज दिवसभर मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर गर्दी केली होती. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आज सायंकाळी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS