संघप्रमुखांच्या मान्यतेनंतर बॉम्बस्फोट- असीमानंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2014

संघप्रमुखांच्या मान्यतेनंतर बॉम्बस्फोट- असीमानंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांची मान्यता मिळाल्यावरच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे बॉम्बस्फोट घडविण्यात आल्याचे, या स्फोटातील आरोपी स्वामी असीमानंद यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असीमानंद यांनी हा खुलासा केल्याने संघ आणि भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका मॅगझीनने असीमानंद यांचे वक्तव्य स्पष्ट करत म्हटले आहे, की मोहनजी यांनी मला सांगितले, की तु हे काम करू शकतो. आम्ही यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. पण, तु हे काम योग्यरित्या करू शकतो, अशी आम्हाला खात्री आहे. या कामातून काहीही चुकीचे होणार नाही. आपले हे काम योग्यच आहे.''

असीमानंद यांचे आरोप फेटाळून लावत संघाचे नेते मा. गो. वैद्य म्हणाले, की हे आरोप चुकीचे आहेत. संघाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. या तीन ठिकाणी 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात शंभरहून अधिक जण मृत्यूमुखी पडले होते. तर, 70 हून अधिक जखमी झाले होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS