मनसेच्या 'रास्ता रोको' आंदोलनामुळे मुंबईतल्या ईस्टर्न एक्सप्रेस वेवरील वाहतूक खोळबंली असतानाच, मध्य रेल्वेनंही चाकरमान्यांना दगा दिला आहे. ठाणे-मुलुंड दरम्यान रुळाला तडे गेल्यानं, ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
मध्य रेल्वेची बोंब, ही आता नित्याचीच बाब झाली आहे. रुळाला तडे जाणं, पेंटोग्राफ तुटणं, सिग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे वरचेवर म.रे. मरगळत असते. परंतु तरीही आज चाकरमान्यांना म.रे.चा आधार वाटत होता. मनसेच्या 'रास्ता रोको'मुळे रस्ते वाहतुकीचे बारा वाजणार, हे नक्कीच होतं. त्यामुळे असंख्य नोकरदार मंडळींनी रस्तेवाहतुकीऐवजी लोकलला पसंती दिली. मात्र इथेही त्यांचा खोळंबाच झाला.

No comments:
Post a Comment