संसदेची मंजुरी मिळताच इंदु मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकर स्मारक उभारणार- मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2014

संसदेची मंजुरी मिळताच इंदु मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकर स्मारक उभारणार- मुख्यमंत्री

नवी दिल्ली : दादर येथील इंदुमिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माणासंदर्भात आज संसदेत एक विधेयक मांडण्यात आले असून संसदेची मंजुरी मिळताच राज्यसरकारकडून स्मारक निर्माणाच्यादृष्टीने पावले उचलण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील वन व पर्यावरणासंदर्भातील प्रश्नांबाबत केंद्रातील मंत्र्यांच्या भेटी तसेच महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन परिषदेत सहभाग घेतल्यानंतर यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

दादर येथील इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण होण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारकडून करावयाच्या कारवाईनुसार आज संसदेत यासंदर्भात विधेयक मांडण्यात आले आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात या विधेयकास मंजुरी देण्याबाबत सर्व संसद सदस्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. संसदेच्या मंजुरी नंतर राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून इंदू मिलची जमीन केंद्र सरकारकडे व त्यानंतर राज्यसरकारकडे अभिहस्तांतरण होवून याबाबतची प्रक्रिया मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री के.एस.राव यांच्याशी आपण यासंदर्भात गेल्या आठवड्यात भेट घेतली होती, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS